Breaking News

संध्याकाळी हि कामे करू नका, अन्यथा आपण देखील कंगाल होण्यास वेळ लागणार नाही

हिंदू धर्मात माता लक्ष्मी माता धनदेवता आहे म्हणून सांगितले आहे. धर्म शास्त्रानुसार लक्ष्मीजी प्रत्येक घरात निवास करतात. प्रत्येकाची इच्छा आहे की लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आणि त्यांची कृपा त्यांच्या घरात कायम राहील. म्हणून सर्व प्रकारे प्रयत्न केले जातात.

शास्त्रात संध्याकाळचा विशेष उल्लेख केलेला आहे. संध्याकाळी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि काळजी ठेवली पाहिजे. जर तसे केले नाही तर संध्याकाळी केलेल्या चुकीमुले लक्ष्मीमाता आपल्या घरातून निघून जाते.

माता लक्ष्मी धन संबधी सर्व समस्या, चिंता दूर तर करतातच शिवाय आपल्यास सुख आणि सौभाग्य देखील प्रदान करत. माता लक्ष्मी बद्दल नेहमी एक गोष्ट बोलली जाते कि,  त्यांची बहीण अलक्ष्मी हि नेहमी त्यांचा बाजूला असते. जे लोक गरीब, दुखी, आळशी, आहेत त्याची देवी म्हणून तिला बोलले जाते.

समुद्र मंथातून प्रथम अलक्ष्मी आली त्यानंतर लक्ष्मी माता आली आहे, ज्या प्रकारे कोणतीही सुंदर वस्तू बिना कचरा बनू शकत नाही तसेच लक्ष्मी आणि अलक्ष्मी ह्या सोबतच असतात. अलक्ष्मीला दुःखाची देवी बोलले जाते. मनुष्याने अनेक दुःख, कष्ट सहन केल्या नंतरच त्याला लक्ष्मी मातेचे आशिर्वाद मिळतात.

चला तर माहिती करून घेऊ अशा कोणत्या चुका आपल्याला टाळल्या पाहिजेत.

धर्म ग्रंथानुसार दिवसा असे मानले जाते कि, दिवस संपण्याच्या वेळी म्हणजेच संध्याकाळी कधीही घर झाडू नये. असे केल्याने झाडू सोबतच घरातून चांगल्या गोष्टी घरातून बाहेर जातात आणि महालक्ष्मी मातेची बहीण अलक्ष्मी घरात प्रवेश करते. म्हणूनच संध्याकाळ होण्यापूर्वी घर स्वच्छ केले पाहिजे.

संध्याकाळी तुळशीच्या झाडाला पाणी टाकू नये किंवा त्याची पाने तोडू नये. शक्य असल्यास संध्याकाळी तुळस स्पर्श करू नका. तुळशीमध्ये पाणी ओतण्यासाठी सर्वात योग्य वेळ म्हणजे सकाळ मानली जाते.

संध्याकाळी कोणत्याहि स्त्री चा अपमान करू नये. मग ते घराच्या बाहेर असो किंवा घराच्या आत. यावेळी स्त्रीचा अपमान करणे पाप मानले जाते. त्यामुळे देखील लक्ष्मी माता आपल्या वर कृपा करत नाही आणि अपयश येत राहते.

ज्या घरात संध्याकाळी झोपतात अशा घरात लक्ष्मी राहात नाही. म्हणूनच, संध्याकाळी घरी झोपू नये.

मला आशा आहे कि, आपण वरील सूचना नक्कीच आपल्या जीवनात अंमलात आणलं आणि आपल्या घरात लक्ष्मी मातेची पूर्ण श्रद्धेने मनोभावे सेवा कराल आणि लक्ष्मी आता देखील आपल्या सर्वावर आपली कृपा करो हि तिच्या चरणी प्रार्थना. नक्की लिहा “जय महालक्ष्मी”.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

About admin

Leave a Reply