Breaking News

घरातील घड्याळ आपले भाग्य बदलू शकते, फक्त ह्या गोष्टीची विशेष काळजी ठेवा

आपल्या आयुष्यात बदल छोट्या छोट्या गोष्टीं मधून होत असतात. कधीकधी एक छोटासा बदल आपल्या आयुष्यात मोठा बदल आणू शकतो. आपण आपल्या समोरील त्रास आणि आव्हानांच्या मूळ कारणा पर्यंत पोहोचले पाहिजे आणि त्यांचे निराकरण वास्तुशास्त्रातून मिळते.

आपल्या घराच्या भिंतीवरील एक घड्याळ सुद्धा वास्तू दोषनिर्माण करू शकते जे आपल्या दुर्दैवास कारणीभूत ठरू शकते. होय, हे अगदी बरोबर आहे. घड्याळ केवळ वेळच सांगत नाही तर आपला वेळ देखील बदलू शकतो.

घरातले घड्याळ तुमचे भविष्य बदलू शकते. जर आपले घर योग्य दिशेने लावलेले नसेल तर ते आपल्या जीवनातील दुःखांसाठी कारणीभूत ठरू शकते. आज आम्ही आपल्याला सांगत आहोत की घड्याळ आपले जीवन कसे बदलू शकते आणि घड्याळ कोणत्या दिशेने ठेवले पाहिजे.

दुर्दैवाचे सूचक म्हणजे बंद पडलेले घड्याळ : एक म्हण आहे की बंद घड्याळ देखील दिवसातून दोनदा योग्य वेळ सांगते. परंतु आपणास हे ठाऊकच नाही की बंद घड्याळ आपल्या नशिबात अनेक प्रकारच्या आपत्तींना जन्म देऊ शकते.

वास्तुशास्त्राच्या नुसार घरात ठेवलेली बंद घड्याळ तुमच्या आयुष्यात अडचणी आणू शकते. वास्तुशास्त्रानुसार मोडलेली आणि बंद घड्याळ हे घरातील दुर्दैवाचे लक्षण आहे. म्हणूनच, आपण प्रथम करण्यासारखी गोष्ट म्हणजे घरामध्ये असलेली बंद आणि तुटलेली घड्याळ काढून टाकणे किंवा दुरुस्त करणे.

ह्या दिशेस लावलेले घड्याळ आपली प्रगती थांबवेल : आपण घरात घड्याळ लावताना दिशेला महत्व देत नाही, फक्त घड्याळात वेळ पाहताना त्रास होणार नाही ह्याची काळजी ठेवतो. वास्तुनुसार ते पूर्ण पणे चुकीचे आहे.

घड्याळ चुकीच्या दिशेने ठेवल्यास तुम्हाला तुमच्या आर्थिक प्रगती बरोबरच आर्थिक नुकसानही सहन करावे लागेल. वास्तुशास्त्रानुसार जर घड्याळ दक्षिणेकडे लावलेले असेल तर घराचा प्रमुख नेहमी आजारी असेल. तसेच घड्याळ दक्षिण दिशेला लावल्याने प्रगतीची संधी मिळणार नाही, आपली प्रगती थांबेल.

आपण आर्थिक आणि प्रगतीशील सक्षम होऊ शकणार नाही. जर आपल्या घराच्या दक्षिणेकडील दिशेने घड्याळ असेल तर ताबडतोब ते आजच काढा. आता आपण घरात जेव्हा पण घड्याळ लावाल तेव्हा दिशानिर्देश लक्षात ठेवा. आपण ज्या भिंतीवर घड्याळ लावणार आहोत त्या भिंतीची दिशा दक्षिण आणि पश्चिम नसावी याची आपण विशेष काळजी घेतली पाहिजे. अन्यथा याचा त्रास तुम्हाला सहन करावा लागू शकतो.

ह्या दिशेला घड्याळ लावल्याने प्रगती होते : वास्तुशास्त्रानुसार घड्याळ पूर्व किंवा उत्तर दिशेच्या भिंतीवर लावले पाहिजे. घड्याळ पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवल्यास वास्तुनुसार तुम्हाला शुभ फायदे होतात व प्रगती होते. या दिशेने घड्याळ लावल्याने आपले नशिब अनेक मार्गांनी बदलेल.

टीप: या लेखात दिलेल्या माहितीनुसार, आम्ही दावा करीत नाही की ही पूर्णपणे सत्य आणि अचूक आहेत आणि त्यांचे अवलंब केल्याने अपेक्षित निकाल मिळेल. जे फक्त सर्वसाधारण जनतेचे हित लक्षात घेऊन मांडले गेले आहेत.

About admin

Leave a Reply